हरवलेली नाती (भाग - 4)
"हो सर मी सांगतो याला याच काम तुम्ही काळजी करू नका." लगेच संकेत म्हणाला
आणि तोच सगळे गप्पांमध्ये रंगून गेले.
"हाय, मी संकेत आणि हा आपला ग्रुप." ओळख करून देत संकेत म्हणाला
"हाय प्रणव." हँडशेक करत प्रणव म्हणाला
"बर प्रणव मला सांग तु कुठला आहेस आणि एज्युकेशन काय झालं आहे तुझ." संकेत ने विचारलं
"मी बेसिकली इकडचाच आहे मुंबईतच राहातो आणि मी एम. सी. ए. केलय ही माझी पहिलीच नोकरी आहे." प्रणव ने सांगितलं
"हे बघ प्रणव एक गोष्ट लक्षात ठेव हे पहिली नोकरी वगैरे काही नसतं आपल्याकडे शिक्षण आहे आत्मविश्वास आहे आणि जर शिकण्याची इच्छा आहे तर सगळच जग आपल्याला बदलता येत तु तयार आहेस." संकेत ने विचारलं
"हो मी प्रत्येक काम करायला तयार आहे." आत्मविश्वासाने प्रणव म्हणाला
"ठिक आहे मग हा तुझा डेस्क आणि हे कंप्युटर आपल्याकडे आजच एक प्रोजेक्ट आल आहे त्याच्या प्रोग्राम मला बनवून दे त्याच बरोबर डाटा एंट्री ही फिल अप करून ठेव ह्या फाईल्स घे नीट चेक कर मग काम सुरु कर" फाईल देत संकेत म्हणाला
"ओके सर.." फाईल घेत प्रणव म्हणाला
"आणि हो मी इथे बॉस नाहीये मी ही तुझ्या सारखाच आहे सो मला संकेत म्हणलस तरी चालेल." स्माईल करत संकेत म्हणाला
तोच प्रणव ही स्माईल करू लागला.
"बर आता मी तुला डिसर्ब करणार नाही हं सुरु कर काम." खांद्यावर हात ठेवत संकेत म्हणाला
आणि आपल्या डेस्कवर गेला. तर प्रणव फाईल चेक करू लागला.
वेळ दुपारची...
1:30 ची...
"हाय अजुन काम झालं नाही का चल जेवायची वेळ झाली." कविता ने विचारलं
"हो झालच येतोच बस थोड्या वेळ." प्रणव म्हणाला
आणि लगेच कविता तिथून निघून गेली.
काही वेळा नंतर...
"हं हे डाटा एंट्री च काम तर झालं बस कोडींग च काम बाकी आहे आता आधी जेवण करतो मग पुढच काम." आवरता आवरता मनात प्रणव म्हणाला
आणि आपला डेस्क आवरू लागला.
साधारण 20 मिनिटांनी...
"हं सगळं आवरून घेतल डाटा फिल अप झाला आता जेवण." प्रणव मनात म्हणाला.
आणि डबा घेऊन कँटीन मध्ये गेला.
सुयोग मल्टी सर्व्हिसेस कँटीन...
कँटीन समोर येताच प्रणवने कँटीन वरून एकदा नजर फिरवली तोच रुद्र ने आवाज दिला.
"प्रणव..." रुद्र ने जोरात आवाज दिला
तोच प्रणव च आवाजाच्या दिशेने लक्ष गेल.
"ये न असा बाहेर का उभा आहेस ये लवकर." रुद्र म्हणाला.
"हो आलो.." प्रणव म्हणाला
आणि कँटीन मध्ये शिरला
"हाय तुम्ही सगळे असेच एकत्र बसता जेवायला." चेअर वर बसत प्रणव ने विचारलं
"हो आम्ही असेच बसतो कायम आणि आता तु ही आमच्या ग्रुप चा हिस्सा आहेस कळाल तेव्हा संकोच करायचा नाही बिनधास्त राहायचं हं." संकेत म्हणाला
"तुमच्या अश्या वागणुकी मुळे खरच मला खुप हलक वाटतय प्रत्येकाच्या मनात थोडी हूरहूर असतेच न." आपला डबा उघडत प्रणव म्हणाला
"काळजी करू नकोस रे तुला इथे खुप मोकळ वातावरण अनुभवायला मिळेल बघ खुप शिकायला मिळेल कस असत न जीथे मोकळ वातावरण असत न तिथेच माणूस ग्रो करू शकतो तुला ही कळेल जेव." संकेत म्हणाला
आणि सगळे जेवण करू लागले.
क्रमशः...
तर प्रणव चा ऑफिस मध्ये पहिला दिवस सुरु झाला आता पुढे काय होणार?
प्रणव ला ती भेटेल का?
अजुन ऑफिस च वातावरण त्याला काय काय शिकवेल?
बघुत पुढील भागात..
No comments:
Post a Comment