Advertisement

Responsive Advertisement

आपल्या हृदयाला एक पत्र ❤️

आपल्या हृदयाला एक पत्र ❤️

दियर हृदय,
तुला किती नाव आहेत रे तुला कुणी मन म्हणत, तर कुणी हृदय आणि कुणी दिल तु कधी विशाल होतोस तर कधी संकुचित 
तुला माहितीये कारे तुझ्याच मुळे व्यक्तींचे प्रकार ही पाडले जातात जर एखादी व्यक्ती वाईट असेल तर ती संकुचित मनाची आणि जर एखादी व्यक्ती चांगली असेल तर ती विशाल मनाची. आणि अस ही म्हणलं जात बर का की तु आमच्याशी संवाद ही साधतोस काय योग्य काय अयोग्य आम्हाला दाखवायचा नेहमी प्रयत्न करत असतोस. 
पण खरच तुझ कुणी ऐकत का रे? तु तर आमची गुपिते ही तुझ्यात साठवून ठेवतोस खरच तुझ्यात एवढी जागा आहे? बघ न... कधी कधी आम्हाला वाईट वाटत मग ती गोष्ट आम्ही तुलाच सोपवतो कधी कधी मैत्रीण तीच गुपित सांगते मग आम्ही ते ही आधी तुलाच सांगतो आणि तु मात्र प्रत्येक गोष्ट तुझ्यात सुरक्षित ठेवतोस.
पण तुला ही कधी वाटत असेलच ना रे आपल ही कुणी तरी ऐकावं माझ्याशी काही सेकंद का होईना संवाद साधावा आमच कस झालं आहे माहितीये आम्ही न तुझ कौतुक करायला तुझ्याशी बोलायलाच विसरलो आहोत आणि हेच खरय प्रत्येकाच आयुष्य मशीन सारख झालं आहे प्रत्येकाला रेस मध्ये फक्त पुढे जायचं आहे त्यामुळे क्षणभर सुद्धा कुणाकडे तुझ्यासाठी वेळ नाही.
पहिले कस होत थोडा वेळ तरी तुझ्यासाठी वेळ काढायचो तुझ्याशी बोलायचो मग अस वाटायचं की सगळ्या चिंता सगळ्या त्रासातून आम्ही बाहेर पडलो आहोत. पण आता साध कुटुंबासाठी देखील वेळ नसतो मग तुझी काय गत. पण तु आमच्यावर रागाउ नकोस हं आम्ही माणसं आहोत आणि तु आमच्यातलाच एक हिस्सा आहेस आम्ही कदाचित तुला विसरलो असेल पण तु मात्र आम्हाला कधी विसरू नकोस कायम आमच्या सोबत रहा आमच्या प्रश्नांची उत्तर शोधून आमच्या समस्या सोडव अस नाहीये रे आम्हाला तुझ्याशी बोलायला आवडत नाही. पण आयुष्यच धकाधकीच झालय न की वेळच मिळत नाही पण तु निराश होऊ नकोस बस शांत रहा कारण वेळ कधीच सारखी नसते हे लक्षात ठेव बाकी तुला तर सगळच माहित आहे हो की नाही.
तुझीच...
तुझ ऐकणारी मी...

Post a Comment

0 Comments