माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामाज
प्रस्तावना :
आपण दिवसभर आपल्या कामा मध्ये बिझी असतो. त्या कामातून संध्याकाळच्या वेळी आपल्याला थोडासा स्वतःसाठी वेळ मिळतो. कधी कधी वाटत एखादी मालिका बघावी पण तेच तेच रटाळ विषय बघून देखील कंटाळा येतो.
अशा वेळी डीजीटलायझेशन मुळे तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे शोज कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. त्यातून ही आपल्याला सगळं काही फास्ट हव असत पण त्यात मजा आनंद ही असायला हवा.
मी बोलतीये शॉर्ट ड्रामा शो बद्दल. ह्या शोज चे एपिसोड्स 1 मिनीट ड्युरेशन चे असतात तसेच ऍडीक्टीव्ह असतात एकदा बघायला सुरवात केली की, 'आता पुढे काय होणार' याची उत्सुकता वाढते आणि आपण शो संपे पर्यंत तो शो बघत राहतो.
पण नेमक शॉर्ट ड्रामा म्हणजे काय? आणी ते कुठे पाहायला मिळेल हे जाणून घेवूत :
शॉर्ट ड्रामा सिरीज म्हणजे काय?
शॉर्ट ड्रामा सिरीज म्हणजे असे शोज ज्याचे ड्युरेशन 1 मिनिटा पर्यंत असतात हे शोज नेहमीच्या मालिका किंवा वेब सिरीज मुव्हीज सारखे नसतात. तर या संपूर्ण सिरीज मध्ये 50 ते 100 एपिसोडस असतात जे तुम्ही 2 ते 3 तासात पूर्ण पाहू शकता.
या शोज चे कथानक वेगवान असते प्रत्येक एपिसोड च्या शेवटी असा काही सस्पेंस क्लिफहँगर असतो कि तुम्हाला पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता लागते.
शॉर्ट ड्रामा सिरीज चे विषय देखील रंजक असतात. रोमान्स, सूड, कौटुंबिक ड्रामा, आणि गरिबीतून श्रीमंत होण्याचा प्रवास अश्या विषयांमुळे तसेच वेगवान कथानका मुळे सिरीज बघण्याचे कुतूहल वाढते.
शॉर्ट ड्रामा शो कुठे पाहायला मिळतील?
शॉर्ट ड्रामा सिरीज बघण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यातील काही पर्याय फ्री आहेत तर काही पेड
शॉर्ट ड्रामा बघण्याचे काही पर्याय :
1. ड्रामा बॉक्स
2. शॉर्टमॅक्स
3. रील्सशॉर्ट
4. स्टोरीज
5. ड्रामालाईट
यावरून तुम्ही कुठलीही सिरीज अगदी सहज बघू शकता.
माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामा सिरीज :
शॉर्ट ड्रामा म्हणलं की आधी उत्सुकता वाढते "आता पुढे काय घडणार हे पाहण्याची" मला आवडलेल्या सिरीज देखील अश्याच आहेत ज्या एक एपिसोड बघताच उत्सुकता वाढवतात.
माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामा
1. अभी जिंदा हु मै
"अभी जिंदा हु मै" या शो ची कथा फिरते अशा एका मुला भोवती जो 10 वर्षांचा असताना एका कुटुंबात प्रेमाचं नातं शोधत येतो पण त्याच्या त्या कुटुंबातले लोक त्याचे आई वडील त्याच्या बहिणी त्याचा दत्तक भाऊ कुणीही त्याला जीव लावत नाही त्याला स्वीकारत नाहीत त्याच्या आईचा समज असतो की हा मुलगा तीचा नसून तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायको चा आहे आणि हाच विचार मनात ठेऊन ती त्याच्यावर लहानपणापासूनच अन्याय करते आणि जेव्हा तीला सत्य समजत तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.
"विकी सिंघानीया" असं त्या मुलाच नाव. विकी आपल्या कुटुंबाच प्रेम मिळवण्याचा 12 वर्ष प्रयत्न करतो पण एक दिवस त्याचा दत्तक भाऊ त्याचा जीव घेतो पण विकी पुन्हा त्याच्या भूतकाळात जाऊन त्याच घरात नव्याने जन्म घेतो आणि आपलं साम्राज्य उभ करून कुटुंबाला पायाशी आणतो.
यातून आपल्याला एक शिकायला मिळत आपलं आयुष्य अशा लोकांसाठी कधीच खर्च करायचं नाही ज्यांना आपली कदर नसते.
सिरीज चे मेन कॅरेक्टर 'विकी सिंघानीया' सुकेश मिश्रा यांनी साकारलं आहे.
ही सिरीज दुःखातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रेरणेच काम करते म्हणून ही सिरीज बघण्यासारखी आहे.
2. धाकडं बल्लेबाज
क्रिकेट प्रेमींसाठी असलेल्या "धाकडं बल्लेबाज" या शो ची कथा अशा एका मुला भोवती फिरते ज्याला लहानपणापासूनच क्रिकेटच बाळकडू मिळालेलं असत पण एका कामगाराच्या षडयंत्रा मुळे त्या मुलाची स्मृती जाते आणि तो एक कामगाराच्या मुलाच आयुष्य जगू लागतो तो सगळं काही विसरलेला असतो एक क्रिकेट सोडल तर त्याला काहीच लक्षात नसतं. आणि शेवटी हे क्रिकेटच त्याला आपल्या कुटुंबाकडे परत आणत या सिरीजचे मेन कॅरेक्टर 'शुभ राठोड /कबीर" आर्यमन देसाई या तरुण कलाकाराने साकारलं आहे. ही सिरीज खूपच बघण्यासारखी आहे
3. गँगस्टर टीचर
'गँगस्टर टीचर' ही सिरीज मुलं आणि टीचरच्या नात्यावर भाष्य करणारी सिरीज आहे. यामध्ये विवान एक गँगस्टर असतो परंतु त्याने आपली खरी ओळख लपवलेली असते तो गँगस्टरच काम सोडून आपल्या आईची शेवटच्या इच्छेसाठी एका शाळेत टीचर बनून येतो त्याला एक डेंजर मुलांचा क्लास मिळतो ज्यांना आजपर्यंत कुणीच सुधारू शकलेलं नसतं. आणि तो त्या मुलांना आपल्या हुशारीने सुधारतो. तो त्यांना फक्त सुधारतच नाही तर ती मुलं टीचर मुळे पास ही होतात
या सिरीज मध्ये टीचर ची भूमिका पंकज भिजलानी यांनी साकारली आहे.
4. डॉ. व्योम
'डॉ. व्योम' या सिरीज ची कथा एका प्रामाणिक डॉक्टर भोवती फिरते जो प्रामाणिक पणे आपलं काम करत असतो पण त्याच्या आयुष्यात एक असं वादळ येत ज्यामुळे त्याची लाईफ आणि करिअर दोन्ही संपत अशा वेळी अचानक त्याची एक पेशंट त्याच्या मदतीला धावून येते आणि खऱ्या गुन्हेगाराला सगळ्यांसमोर आणते ह्या प्रवासात दोघांना प्रेम होत आणि शेवटी दोघांच लग्न होत.
या सिरीज मधील मुख्य कॅरेक्टर 'डॉ. व्योम' सुकेश मिश्रा यांनीच साकारलं आहे.
5. दिवाली होमकमींग
'दिवाली होमकमींग' सिरीज ची कथा दिवाली दिवशी घडणाऱ्या घटने भोवती घडते.
साहिल जो घरच्यांचा विरोध पत्करून लग्न करतो आणि घर जावई बनतो. पण सासरी त्याला चुकीची वागणूक दिली जाते हे बघून तो आवाज उठवतो मग कळत तो करोडपती आहे.
या सिरीज मध्ये साहिल ची भूमिका सुकेश मिश्रा यांनी केली आहे.
6. सी. ई. ओ. ज सिक्रेट रूममेट
'सी. ई. ओ ज सिक्रेट रूममेट' ही सिरीज सध्या जियो हॉटस्टार तडका वर नुसती धुमाकूळ घालत आहे या सिरीज ची कथा एक फ्लॅट आणि दोन ओनर्स भोवती फिरते आर्यन आणि दिया दोघांना एकच फ्लॅट मिळतो आणि नाईलाजाने दोघांना ही एकच फ्लॅट शेअर करावा लागतो व या त्यांच्या प्रवासात हळुवार त्यांची प्रेमकहाणी पुढे सरकत जाते मनाला भिडणाऱ्या या सिरीज मधील मेन कॅरेक्टर आर्यन आणि दिया यांची भूमिका सुकेश मिश्रा आणि काजल चौहान यांनी साकारली आहे
या आहेत माझ्या ऑल टाइम फेव्हरेट सिरीज ज्या मी कधी ही कुठे ही बघू शकते. आणि तुमच्या? मला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग ला जरूर फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन पोस्ट वाचायला मिळतील
निष्कर्ष..
आजच्या धावपळीच्या युगात, जिथे प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे, तिथे 'शॉर्ट ड्रामा सिरीज' मनोरंजन क्षेत्रातील एक क्रांती म्हणून समोर आल्या आहेत. अवघ्या १ मिनिटाच्या एपिसोड्समध्ये खिळवून ठेवणारी कथा आणि उत्कंठावर्धक सस्पेन्स यामुळे हे शोज अत्यंत लोकप्रिय ठरत आहेत.
कमी वेळेत भरपूर मनोरंजन आणि मनाला रिफ्रेश करण्याची ताकद या शॉर्ट ड्राम्यांमध्ये आहे. मग तो 'अभी जिंदा हु मै' मधील विकीचा संघर्ष असो, 'गँगस्टर टीचर'ची रंजक कथा असो किंवा 'सी.ई.ओ. ज सिक्रेट रूममेट' मधील गोड प्रेमकहाणी; हे शोज आपल्याला खिळवून ठेवतात यात शंका नाही. जर तुम्ही अजूनही हे प्लॅटफॉर्म्स ट्राय केले नसतील, तर आजच तुमच्या आवडीनुसार एखादी सिरीज नक्की पाहा!
अशाच नवनवीन, रंजक आणि हटके डिजिटल कंटेंटच्या माहितीसाठी माझ्या ब्लॉगला नक्की फॉलो करा, जेणेकरून येणारी प्रत्येक नवीन पोस्ट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल!
No comments:
Post a Comment