Advertisement

Responsive Advertisement

नात - एक अनोख्या प्रवासाची सुरवात (भाग - तीन)

नात - एक अनोख्या प्रवासाची सुरवात (भाग - तीन )

प्रवेश चौथा :

तनवीची खोली..

(लाईट्स ऑन होतात रंगमंच्यावर तनवीची खोली दाखवली आहे तनवी मोबाईल वर सर्च करण्यात मग्न आहे तसेच तिच्यावर प्रकाशाचा झोत पडला आहे.)

तनवी (सर्च करत मनाशीच बोलते) : "अच्छा तर आरव एका एनजीओ शी ही जोडला गेला आहे तर, ओह हं मुलाखतीत म्हणाला होता आरव. गुगल सर्च करू. (तनवी गुगल सर्च करते.)
हं, अच्छा म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे आरवची एकदा इंस्टा ही चेक करू. (इंस्टा चेक करत). काय हे इतक्या चांगल्या हरहुनरी कलाकाराचे एक ही फॅनपेज नाही. ठिक आहे आपण बनवू चांगल्या लोकांचं काम जगासमोर यायला हव."

(तनवी इंस्टा फॅनपेज बनवते "AravDeshmukh_Universe_")

तनवी (पेजकडे बघत मनाशीच बोलते) : "हं, खुप भारी दिसतय आता एक पोस्ट अपलोड करते पहिले आरवला फॉलो करते. कळू तर दे त्याला ही त्याची कुणी तरी प्रशंसक आहे."

(आणि लगेच एक सुंदर एडिट केलेला फोटो पोस्ट करते आणि लाईट्स ऑफ होतात.)

प्रवेश पाचवा :

आरवच घर :

(लाईट्स ऑन होतात. रंगमांच्यावर एक साधीशी खोली आहे पण नीटनेटकी बेडच्या भिंतीवर आरवचा च एक फोटो लावलाय हातात अवॉर्ड घेतलेला समोर आईचा फोटो आहे तसेच फोटो च्या बरोबर खाली एक लहान एल सी डी टीव्ही ठेवला आहे. बेड च्या बाजूला एक गॅलरी आहे जीथे शांततेत आरव स्क्रिप्ट वाचण्यात मग्न आहे तोच मोबाईल वर एक नोटिफिकेशन येत आणि आरवच मोबाईल कडे लक्ष जात.)

आरव (मोबाईल वरील नोटिफिकेशन बघत) : "अरे, माझं ही फॅनपेज? छान आहे एडिट पेजला फॉलो बॅक देतो."

(आरव इंस्टा पेज ला फॉलो बॅक देऊन पोस्ट ला लाईक करतो. तोच तनवी ला नोटिफिकेशन जात आणि लाईट्स ऑफ होतात.)

क्रमशः..

तर, आरव आणि त्याची फॅन तनवी ह्यांची ही होती छोटीशी भेट पण मग आता पुढे काय कस समजेल आरवला दोघांच हे नात? बघुत पुढील भागात 

Post a Comment

0 Comments