नागझिला - द लास्ट ट्रिप ऑन इजलँड - ही सीरिज का पहावी
प्रस्तावना :
चला, आज जरा वेगळ्या विषयावर बोलुया. पण त्या आधी माझा एक प्रश्न.
तुम्ही नेमक काय बघता? तुमची मनोरंजनाची साधने कुठली आहेत? खर तर आज कालच्या धावपळीच्या जगात आपल्याला दोन मिनिट क्षणभर देखील विसाव्याचे मिळत नाही आणि मिळालेच काही क्षण विसाव्याचे वाटलच काही तरी चांगल बघावस तर तेच तेच रटाळ विषय असतात.
पण आता मनोरंजनाची साधने बदलली आहेत. आता मनोरंजन बदल्ल आहे डिजिटल मनोरंजनाचा जमाना आला आहे आधी संध्याकाळ झाली की सगळं कुटुंब एकत्र टीव्ही पाहायला बसायचं पण आता सगळ्याच गोष्टी मोबाईल च्या एका क्लिक वर आपल्या पर्यंत पोहोचतात मग मनोरंजन कस मागे राहील.
आधी आपण अर्ध्या तासाचे एपिसोड असलेल्या मालिका एक तासाचे एपिसोड असलेल्या मालिका बघायचो नंतर टीव्ही ची जागा ओटीटी प्लॅटफॉर्म ने घेतली तीथे ही एक एपिसोड पाच मिनिटा पर्यंत असायचा पण एक गोष्ट इथे होती जर पाच मिनिटा च्या एपिसोड साठी सब्सक्रीप्शन घेतलं तर फ्री आणि तेच जर सब्सक्रीप्शन न घेता एपिसोड बघायचा विचार केला तर मात्र ऍड बघत एपिसोड बघावा लागायचा आणि आता स्क्रीन तीच आहे पण एपिसोडच ड्युरेशन बदललं आहे जे एपिसोड संपायला पाच मिनिट लागायचे तेच आता कमी होऊन एक मिनिटा पर्यंत झाले आहेत म्हणजे आता मनोरंजन अजून धमाकेदार झाल आहे पण नेमक हे काय आहे.
चला तर मग आज जाणून घेवूत व्हर्टीकल सिरीज बद्दल
बदलत्या काळात व्हर्टीकल सीरिज चे महत्व :
मनोरंजनात्मक कार्यक्रम बघणं कुणाला आवडत नाही. आपल्या व्यस्त जीवन शैलीतून थोडीशी विश्रांती घेत चांगले कार्यक्रम बघणं काहीच चुकीचं नाही. आणि इथेच व्हर्टीकल सीरिजचे महत्व प्रकर्षाने वाढत आहे.
व्हर्टीकल सीरिजची वैशिष्ट्ये :
ही आहेत व्हर्टीकल सीरिजची वैशिष्ट्ये :
1. कमी वेळात मनोरंजन :
* व्यग्र जीवनशैली : आजकाल लोकांकडे टीव्ही किंवा सिनेमा हॉल मध्ये 3 तास बसण्यासाठी वेळ नसतो.
* रिकाम्या वेळेचा वापर : बस - ट्रेनचा प्रवास, लिफ्टची वाट पाहणे किंवा ऑफिसच्या छोट्या ब्रेक मध्ये 1 ते 3 मिनिटांचे भाग सहज पाहता येतात.
2. मोबाईल - फस्ट युजरसाठी सोयीस्कर :
* सहजता : फोन आडवा न करता, फक्त एका हाताने उभा पकडून या सीरिज पाहता येतात
* सवयींशी सुसंगत : इंस्टाग्राम रील्स आणि टिकटॉकमुळे लोकांना उभे व्हिडीओ स्क्रोल करण्याची सवय झाली आहे, व्हर्टीकल ड्रामा याच सवयी चा फायदा घेतो.
3. कमी अटेंशन स्पॅन :
* झटपट उत्सुकता : आजच्या पिढीचा अटेंशन स्पॅन कमी झाला आहे.
* फास्ट स्टोरीटेलिंग : या सीरिजमध्ये पहिल्या 3 सेकंदातच प्रेक्षकांना खिळवून ठेवले जाते आणि प्रत्येक भागाच्या शेवटी मोठा ट्वीस्ट असतो, ज्यामुळे कंटाळा येत नाही.
4. भावनांचा थेट अनुभव :
* चेहऱ्यावरील हावभाव : उभ्या स्क्रीनमध्ये पात्रांचे चेहरे जवळून आणि मोठे दिसतात.
* थेट नाते : यामुळे पात्रांच्या भावना आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडतात.
5. नवीन कलाकार आणि क्रिएटर्ससाठी मोठी संधी :
* कमी बजेट, वेगवान काम : या सीरिज खूप कमी बजेटमध्ये तसेच याच केवळ 6 ते 10 दिवसात शुटिंग होत.
* स्थानिक रोजगार : मोठया प्रोडक्शन वर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर नवीन लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांना या द्वारे प्रचंड काम मिळत आहे.
नागझीला - द लास्ट ट्रिप ऑन स्नेक इजलँड - ही सीरिज का पहावी :
तुम्हाला सस्पेंस थ्रीलर बघायला आवडत का? जर आवडत असेल तर ही सीरिज तुमच्याच साठी आहे.
ही सीरिज का पहावी...
"नागझिला - द लास्ट ट्रिप ऑन स्नेक इजलँड"
खर तर ही सीरिज सगळ्यांनीच बघण्यासारखी आहे. ही सीरिज सर्वायवल प्रेम धोका आणि निखळ मैत्री यावर आधारित आहे. ह्या सीरिज मध्ये भय, गूढ थरारक असे सगळेच रंग बघायला मिळतात आणि त्यामुळे हा एक स्ट्रॉंग पॉईंट देखील ह्या सीरिज चा आहे.
याची सुरवात एका महादेवाच्या शक्तीने होते. कबीर जे सीरिज मधील मुख्य पात्र आहे त्याला अचानक ही शक्ती मिळते आणि त्याला भविष्यात घडणाऱ्या मृत्युची आधीच चाहूल लागते. आणि कबीर तसेच त्याचे मित्र सगळ्यांचा एक थरारक प्रवास सुरु होतो.
सीरिज मधील मेन पात्र कबीर आपल्या मित्रांबरोबर ऍडव्हेंचर ट्रिपला जंगलात आलेले असतात. तीथे अचानक कबीरला एक शक्ती मिळते आणि त्याला स्वप्नातून त्याचा आणि त्याच्या मित्रांचा मृत्यू दिसतो.
पण हे फक्त एक भविष्य नसतं तर महादेवाने स्वप्नाच्या माध्यमातून एका कृत्यावरून पडदा उघडलेला असतो एक सत्य दाखवलेलं असत. हे स्वप्न सत्य आणि साहसाचा संकेत असतो.
कबीर स्वप्नात बघतो, रात्रीच्या वेळी भर पावसात कबीर आणि त्याचे मित्र जिवाच्या आकांताने पळत आहेत आणि त्यांच्या मागे एक विशालकाय अजगर लागलं आहे. आणि म्हणून त्याच्या भीतीने सगळे जीव मुठीत धरून पळत आहेत. पण एक वेळ अशी येते की त्याचे फ्रेंड्स त्याचा साथ सोडून देतात. कबीर चा मित्र वीर गर्लफ्रेंड साठी कबीरवर दगडाने हमला करणारच असतो तोच कबीर समोर विशालकाय अजगर येत आणि कबीर जागा होतो.
पुढे कबीर च्या फ्रेंड ची त्याच जंगलात बंद पडते तिथेच कबीरला अजगराची कात दिसते आणि त्याला आपल्याला मिळालेल्या शक्ती ची जाणीव होते.
ही सीरिज भय, धोका, आणि मैत्री यावर आधारित आहे. या सीरिज मधील कबीरला शेवट पर्यंत आपल्या फ्रेंड्सना वाचवताना दाखवलं आहे. ह्यात कबीरचा चांगुलपणा खऱ्या मैत्रीची जाणीव स्पष्ट दिसते आणि मानत विचार आल्या शिवाय राहात नाही की प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी मित्र असावा हेच कबीर या पात्रा च यश आहे.
नागझिला च वैशिष्ट्य :
नागझिला ही सीरिज जितकी रहस्यमय आहे तितकीच उत्सुकता वाढवणारी देखील आहे सीरिज बघताना मनात एक प्रश्न नक्कीच उभा राहतो "आता पुढे काय होणार" आता "कबीर चा पुढचा प्रयत्न काय असेल" आणि हेच प्रश्न ही सीरिज बघितलीच पाहिजे असा ठाम विश्वास मनात निर्माण करतात आणि हेच ह्या सीरिज च सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्याबरोबर आजून ही ह्या सीरिज ची वैशिष्ट्य आहेत ती अशी :
1. प्रत्येक कलाकारचा अभिनय :
ह्या सीरिज मध्ये बऱ्याच नामवंत कलाकारांनी काम केल आहे. या सीरिज मधील प्रत्येक कलाकाराची मेहनत सीरिज बघताना दिसते जाणवते. प्रत्येक कलाकाराचा अभिनय दमदार झाला आहे.
ह्या सीरिज मध्ये मुख्य कलाकार आहेत.
सुकेश मिश्रा (कबीर)
मुस्कान कामदार (अनन्या)
विशेष शर्मा (वीर)
तसेच इतर कलाकार आहेत.
हेमांग सिरोही
नितीन सप्रा
प्रिन्स भाटिया
पूर्ती आर्या
यांचा ही या सीरिज मध्ये दमदार अभिनय झाला आहे.
2. स्पेशल इफेक्ट :
ही सीरिज शॉर्ट ड्रामा सीरिज आहे त्यामुळे कमी ड्युरेशन मध्ये लोकांना खिळवून ठेवण त्या थरार चा अनुभव देण हे या सीरिज च सगळ्यात महत्वाच काम होत. आणि स्पेशल इफेक्ट मुळे ह्या सिरीजकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. स्क्रीन उभी असल्याने सीरिज मधील अजगर आपल्याकडे येतोय की काय हा फील बघणाऱ्याच्या मानत नक्कीच कोरला गेला आहे
3. कथा :
"नागझिला - द लास्ट ट्रिप ऑन स्नेक इजलँड" ही सीरिज फँटसी, थरार, सर्वायवल, मिस्ट्री यावर आधारित आहे. तसेच ह्या सिरीजची कथा देखील दमदार आहे प्रत्येक भाग बघताना उत्सुकता वाढते "आता पुढे काय घडणार?" हा प्रश्न मनात उभा राहतो सीरिज बघताना जाणवत लिहिणाऱ्याने किती विचार केला असेल प्रत्येक भाग कमी ड्युरेशन चा असल्याने कथेचा अगदी बारीकीने विचार केला गेला आहे आणि हेच सीरिज च यश आहे.
ही सीरिज कुठे पाहता येईल :
ह्या सीरिज चे एकूण 53 एपिसोड आहेत. शिवाय ह्या सीरिज चे 5.4CR इतके व्यूज झाले आहेत प्रत्येक भाग अश्या ट्वीस्ट ने संपवण्यात आला आहे की व्युअर्स ना नवीन विषय बघण्याचा आनंद नक्कीच होतो. ही सीरिज ड्रामा लाईट आणि ड्रामा स्टोरी या दोन्ही ही प्लॅटफॉर्म वर पाहता येते.
एकूणच "नागझिला - द लास्ट ट्रिप ऑन स्नेक इजलँड" ही सीरिज भीतीचा अनुभव करवते तसेच उत्कंठा ही वाढवते त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी ही सीरिज बघावीच.
निष्कर्ष :
बदलत्या काळाबरोबर मनोरंजनाची माध्यमे आणि प्रेक्षकांच्या अपेक्षाही बदलत आहेत. पारंपरिक मालिका आणि चित्रपटांपासून सुरू झालेला हा प्रवास आता अगदी कमी वेळात प्रभावी कथा सांगणाऱ्या व्हर्टीकल सीरिजपर्यंत येऊन पोहोचला आहे. कमी कालावधी, मोबाईलसाठी अनुकूल स्वरूप, वेगवान कथानक आणि प्रत्येक भागाच्या शेवटी निर्माण होणारी उत्सुकता यामुळे व्हर्टीकल सीरिज आजच्या डिजिटल युगातील मनोरंजनाचे एक महत्त्वाचे माध्यम बनत आहे.
याच बदलत्या मनोरंजनविश्वाचे उत्तम उदाहरण म्हणजे "नागझिला - द लास्ट ट्रिप ऑन स्नेक इजलँड". भय, रहस्य, थरार, सर्वायवल, मैत्री आणि फँटसी यांचा सुरेख मिलाफ या सीरिजमध्ये पाहायला मिळतो. कबीरच्या माध्यमातून मैत्री, धैर्य आणि आपल्या माणसांना वाचवण्याची जिद्द प्रभावीपणे समोर येते. त्यासोबतच कलाकारांचा अभिनय, स्पेशल इफेक्ट्स आणि प्रत्येक भागाला दिलेले ट्विस्ट कथेला अधिक रंजक बनवतात.
विशेषतः उभ्या स्क्रीनचा प्रभावी वापर आणि कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याची शैली ही या सीरिजची जमेची बाजू आहे. प्रत्येक भागानंतर निर्माण होणारा "आता पुढे काय?" हा प्रश्नच प्रेक्षकांना पुढचा भाग पाहण्यास प्रवृत्त करतो आणि हीच एका यशस्वी व्हर्टीकल सीरिजची खरी ताकद आहे.
एकंदरीत, "नागझिला - द लास्ट ट्रिप ऑन स्नेक इजलँड" ही केवळ एक थरारक सीरिज नसून बदलत्या डिजिटल मनोरंजनाच्या प्रवाहाची झलक देणारी सीरिज आहे. कमी वेळेत प्रभावी कथा, दमदार अभिनय आणि उत्कंठावर्धक मांडणी अनुभवायची असेल, तर ही सीरिज नक्कीच एकदा पाहण्यासारखी आहे.
कारण मनोरंजन बदललं आहे… स्क्रीन बदलली आहे… आणि कथा सांगण्याची पद्धतही बदलली आहे. आता प्रश्न एवढाच — तुम्ही या नव्या मनोरंजनाच्या प्रवासासाठी तयार आहात का?
0 Comments