Advertisement

Responsive Advertisement

नातं - एक अनोख्या प्रवासाची सुरवात

तुमचा आहे का विश्वास अश्या एका नात्यावर जे रक्ताच्या नात्या पेक्षा ही जवळच असेल जर तुमच्या ही आयुष्यात अस एखाद नातं असेल तर हे नाटक तुमच्या साठीच आहे 

नातं - एक अनोख्या प्रवासाची सुरवात 

पात्र परिचय :

आरव (30) अभिनेता 
तनवी (25) लेखिका 
सतीश राणे (45) मुलाखतकार 
निशा (25) खोटी व्हिक्टम 
चेतन (28) पर्सनल मॅनेजर 
केडी (24) सायबर एक्सपर्ट 
जाधव (49) पोलीस अधिकारी 
संयोगिता (35) पत्रकार 

अंक पहिला 
प्रवेश पहिला 

(रंगमंच्यावर दोन खुर्च्या आहेत त्यावर दोन व्यक्ती बसले आहेत त्यांच्यावर प्रकाश झोत पडतोय आणि तोच पडदा उघडतो.)

सतीश राणे : "तर, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या कार्यक्रमात ज्याच नाव आहे सत्याचे बोल. रसीकहो, आपण नेहमीच या मंचावर नव नवीन लोकांना बोलवत असतो आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न ही करत असतो. तर आज आपण अशाच एका कलाकाराला भेटणार आहोत ज्याचं नाव आहे आरव देशमुख. आरवला आपण बऱ्याच लोकप्रिय मालिकांमधून बघितलय पण तो खऱ्या आयुष्यात कसा आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. तर आरव सगळ्यात आधी तुझं या कार्यक्रमात स्वागत. मला तुझ्या अभिनयाच्या प्रवासा बद्दल थोडस सांग न म्हणजे तु या क्षेत्रात कसा आलास?"

आरव : "थँक यु सतीश जी. खर तर या क्षेत्रात यायचा माझा कधीच विचार नव्हता पण म्हणतात न. जे काही असत ते नियतीच ठरवत असते. मी किती ही दुसरं काही करायचं ठरवलं असत तरी नियतीने आधीच माझी ओळख ठरवून ठेवली होती बस वेळ आली आणि माझा प्रवास सुरु झाला. मला आठवतय मी खूप लहान होतो त्यावेळी मी शाळेच्या एका नाटकात काम केल होत त्यावेळी नाट्यक्षेत्रातल्या दिग्गज सुनंदा ताई आमचं गॅदरिंग बघायला आल्या होत्या त्यांना माझं काम खूप आवडल होत म्हणून त्यांनी आईला माझ्या बद्दल विचारलं तर आई हो म्हणाली आणि मग ताईंनी मला त्यांच्या अगामी टीव्ही शो साठी कास्ट केल आणि मी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला."

सतीश राणे : "बर, आपण जरा पुढे जाऊयात एक कॉलेजचा इव्हेंट होता मला सांग नेमक त्यावेळी काय घडलं होत.?"

आरव : "अहो, सर कशाला जुन्या गोष्टी काढताय झालं की कॉलेज आता."

सतीश राणे : "आरव या शो मधून बोलावलेली व्यक्ती खऱ्या आयुष्यात कशी आहे हे आपण दाखवायचा प्रयत्न करत असतो आणि लोकांना ही जाणून घ्यायच आहे तुझ्या बद्दल."

आरव : "तस ही खूप जुनी घटना आहे. जस प्रत्येक कॉलेज मध्ये सिनियर जुनियर फंडा असतो तसाच हा ही प्रकार होता त्यावेळी आम्ही तुझी सोबत - प्रेमाचा एक प्रवास ह्या नाटकाची रियसलं करत होतो. आणि अचानक काही सिनियर्स गोंधळ घालायला आले. त्यांचा विचार आमचा आत्मविश्वास तोडण्याचा होता ते आमच्यातल्या एकाला त्रास देऊ लागले बरीच मारामारी झाली आणि त्यात जो लीडर होता त्याच्या भावाला जास्त लागलं शेवटी मीच पुढाकार घेउन त्याला दवाखान्यात नेलं आणि तिथून ही सिनियर जुनिअर दरी संपुष्टात आली."

सतीश राणे : "बर, मग आता सध्या कुठल्या नवीन प्रोजेक्ट वर तुझं काम सुरु आहे?"

आरव : "मी सध्या निलम आर्ट्स च एक प्रोजेक्ट करतोय आणि अजून दोघा तिघांशी माझं बोलण सुरु आहे."

सतीश राणे : "आरव मी अस ऐकलय तु रिकाम्या वेळेत एका अनाथ आश्रमासाठी सुद्धा काम करतोस तुझा हा प्रवास कसा सुरु झाला.?"

आरव : "हो, करतो मी अनाथ आश्रमासाठी काम. आणि मला ही संधी मिळाली याच श्रेय मी त्या घटनेला देईन. तुम्ही आत्ताच कॉलेज बद्दल विचारलंत ही घटना ही त्याच पिरेड मधली आहे कॉलेज मध्ये असताना मी एक शो करत होतो त्यावेळी शूटिंग संपवून मी घरी परतत असताना दोन मुली एकदम माझ्या कार समोर आल्या त्यांचा पेहराव कपडे मळलेले होते अस वाटत होत त्या दोघी कचरा गोळा करणाऱ्या असाव्यात त्यांना बघताच मी गाडीतून उतरलो आणि त्यांची विचारपूस केली तेव्हा समजलं त्या दोघी एका अनाथाश्रमातल्या आहेत पण बाहेर जाऊन काम करतात त्या आश्रमातल्या प्रत्येक मुलांकडून अस काम करउन घेतलं जात हे ऐकल्यावर मी ठरवलं त्या सगळ्या मुलांची मी जबाबदारी घेईन मी त्या मुलींना घेऊन पोलीस स्टेशनं ला गेलो त्यांना सगळं सांगितलं आणि त्यांची मदत घेऊन स्ट्रीक्ट ऍक्शन घेऊन सर्व मुलांना सोडवलं आज सगळी मुलं सुखरूप आहेत आणि शिकत आहेत."

सतीश राणे : "खरच आरव तुझं काम आणि तुझा प्रवास प्रेरणादायी आहे आता एक शेवटचा प्रश्न तुझ्या सारखं या इंडस्ट्री मध्ये येऊ पाहणाऱ्या नवीन पिढीला तु काय संदेश देशील?"

आरव : "खर तर मी देखील अजून ही शिकतच आहे. आणि आजच्या पिढीला ही मी हेच सांगेन शिकत रहा आणि संधी कधी चुकवू नका कारण शिकत रहाल तरच संधींच स्वागत करू शकाल तेव्हा शिकत रहा मेहनत करा तुमच क्षितीज तुमची वाट पहात आहे. थँक्यु."

सतीश राणे : "खरच तुझ्या आयुष्याचा आणि कारकिर्दीचा प्रवास जाणून खूप छान वाटलं तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते आरव देशमुख. संकट समस्या कुणाच्या आयुष्यात नसतात पण जो कणखर राहून प्रत्येक समस्येला तोंड देतो आणि स्वतःच्या विश्वासाने बाहेर पडतो तोच तर खरा विजेता असतो आणि या शो चा ही उद्देश हाच आहे की समस्या असून ही आपली खरी ओळख जगा समोर स्वतःला सिद्ध करणाऱ्या लोकांची तुम्हाला ओळख करून देण. तर अश्याच प्रेरणादायी लोकांना भेटण्यासाठी हा शो बघत रहा आणि आम्हाला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तोपर्यंत भेटू पुढच्या एपिसोड मध्ये एका नवीन पाहुण्यासह नमस्कार."
(लाईट्स ऑफ होतो)

प्रवेश दुसरा

(लाईट्स ऑन होतो. रंगमचावर एक साधी खोली आहे खोलीत प्रवेश करताच डाव्या साईडला नीटनेटका ठेवलेला बेड आहे आणि बेडवर लॅपटॉप ठेवलय त्याला एक मोबाईल चार्ज होतोय खोलीच्या प्रवेश द्वारा मागे एक स्टडी टेबल ठेवलाय त्या टेबलावर काही पुस्तके ठेवली आहेत एक लॅम्प ठेवलाय तसेच बेडच्या मागच्या भिंतीवर एक स्टारच पोस्टर ही लावल आहे आणि बेडवर बसून एक मुलगी इंटरव्यु बघतीये.)

(लाईट्स ऑन होतो )

तन्वी : (मनाशीच ) "खरच, खूप प्रेरणादायी प्रवास आहे याचा पण एवढ्या देखण्या कलाकाराने नेमक अस काय पाहिलं असेल? ओह ब्लॉग वर अजून एक पोस्ट आली वाटत बघू तरी काय लिहिलं आहे आज च्या पोस्ट मध्ये."

(तन्वी लॅपटॉप वर दुसऱ्या व्यक्तीचा ब्लॉग बघतीये तोच लाईट्स ऑफ होतात आणि पडदा पडतो.)

क्रमशः...

तर वाचत रहा आनंद घेत रहा एक स्वरचित मराठी एकांकिका घेऊन आलीये कशी वाटली मला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा 

कोण आहे आरव आणि कोण आहे तन्वी काय नातं आहे दोघांच समजून घ्यायच असेल तर नाटक पूर्ण वाचा लवकरच पुढचा भाग येईल 



Post a Comment

0 Comments