Advertisement

Responsive Advertisement

नातं - एक अनोख्या प्रवासाची सुरवात (भाग - दोन )

नातं - एक अनोख्या नात्याची सुरवात (भाग - दोन)

अंक दुसरा... 
प्रवेश तिसरा...

तन्वीची खोली...

तन्वी : "हं, बघु आज ब्लॉग मध्ये काय लिहिलय (मनात बोलत) काय?
"तोच सुरु तोच स्वर आज पुन्हा तुझी आठवण आली आणि अचानक तु डोळ्यासमोर उभी राहिलीस आई मला माहितीये तु या जगात नाहीयेस पण का कुणास ठाऊक मला ह्या स्पेसमध्ये माझ्या हक्काच्या ठिकाणी तुझ्याशी बोलावस वाटत ग हा ब्लॉग फक्त ब्लॉग नाही माझ्या आयुष्याची डायरी आहे जीथे मी तुझ्या जवळ माझं मन मोकळ करतो आज सांगायचं म्हणजे आज तुझ्या मुलाचा इंटरव्हयु होता आणि तुला माहितीये जस जस जुन्या आठवणी निघत गेल्या न मला प्रत्येक आठवणीत तु डोळ्यासमोर येत होतीस ग अस वाटत होत आयुष्य तिथेच कुठेतरी थांबलं आहे. बाकी इंटरव्हयु खूप छान झाला सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या मन अगदी बाल पणात निघून गेलं बघ. आता उद्याची तयारी उद्यापासून तेच रुटीन. बाकी परत आपण पुन्हा भेटूच तो पर्यंत माझी वाट पहा हं."
ओह म्हणजे ह्याचा ही आज इंटरव्हयु होता तर, पण नेमक हा आहे तरी कोण? शीट अन्नोन नाव असल्याने कळत ही नाहीये. एक मिनिट हा अन्नोन ब्लॉगर आरव तर नाही? काय लिहिल आहे ह्यात "मला माहितीये तु या जगात नाहीयेस." ओएमजी ह्याला आई नाहीये. हं जर हा आरव असेल तर ह्याच्या आई बद्दल कळेलच की, वेट चेक करते.
(सोशल मीडियावर चेक करत). व्हॉट म्हणजे आरवच हा ब्लॉग लिहितोय? बापरे म्हणजे हा इतका देखणा ऍक्टर बरोबर हळव्या मनाचा ब्लॉगर ही आहे? का कुणास ठाऊक पण याला भावाच्या रूपात बघावस वाटतय करूयात का याला ब्लाईंटली सपोर्ट (मनाशीच बोलत) करूच."
(तन्वी विचार करत लॅपटॉप बंद करते तोच लाईट ऑफ होतो)

(लाईट ऑन होतो रंगमंच्यावर तन्वीची खोली आहे खोलीत तन्वी विचारमग्न फेऱ्या मारतीये)

तन्वी : "ह्या जगात कसली लोक असतात न, खरच जो मी विचार करतीये तसाच आरव असेल का? आणि त्याला आवडेल का मी त्याला सपोर्ट केलेलं? पण मी त्याला कशा कशात सपोर्ट करू शकते...? हं, त्याच फॅन पेज बनवते आधी बघते त्याच कुठल फॅन पेज आहे का? हं ह्यापासून काम करते मग पुढे बघु."
(तन्वी फेऱ्या मारत एक निर्णय घेते आणि लॅपटॉप वर सर्च करते तोच लाईट ऑफ होतो आणि पडदा पडतो)

क्रमशः 

तर हे नाटक आहे एका ऍक्टर आणि लेखक च्या हळव्या नात्यावर आरव देशमुख जो नव्याने लोकांच्या नजरेत आला आहे तर तन्वी जीने नव्याने च पाऊल ठेवलय लेखन क्षेत्रात काय होईल पुढे यांच्या सुंदर हळव्या नात्याच?
तन्वीला समजलय आरवच तो ब्लॉगर आहे ज्याचे ब्लॉग्ज तन्वी वाचत असते तन्वी आरवला सपोर्ट करू शकेल का?
पाहूत पुढील भागात 

Post a Comment

0 Comments