माझी आवडती टॉप 3 पुस्तके जी इतरांनी ही वाचलीच पाहिजेत.
प्रस्तावना :
तुम्हाला वाचनाची आवड आहे का? तुम्ही ही चांगली पुस्तके वाचता का?
आज मी तुम्हाला माझ्या आवडत्या टॉप 3 पुस्तकांबद्दल सांगणार आहे जी तुम्ही सुद्धा एकदा वाचलीच पाहिजेत. पण त्या आधी मला सांगा तुम्ही कधी तुमच्या सवयींबद्दल विचार केला आहे का? कधी सवयी बदलण्याचा विचार केला आहे का? ही 3 पुस्तकं फक्त तुमच्या सवयींवरच काम करणार नाहीत तर तुम्ही तुमची उत्पादन क्षमता कशी वाढवू शकता यासाठी सुद्धा मदत करतील मग कुठली आहेत ही पुस्तके आणि ही पुस्तके तुम्ही का वाचावीत याची उत्तरे शोधुयात :
माझी आवडती टॉप 3 पुस्तके. :
ही आहेत माझी आवडती टॉप 3 पुस्तके जी तुम्ही सुद्धा वाचलीच पाहिजेत.
१. अति परिणाम कारण लोकांच्या 7 सवयी :
स्टीफन कोवे लिखित "अति परिणाम कारक लोकांच्या 7 सवयी" हे पुस्तकं अश्या 7 सवयीं बद्दल आहे ज्या आपल्याला असाधारण परिणाम मिळवून देतात.
हे पुस्तकं माणसाला वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करते. हे यश मिळवण्यासाठी ७ सवयींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
7 सवयींचा संक्षिप्त सारांश :
सवय १ : प्रोएक्टिव्हा रहा :
परिस्थितीला दोष न देता स्वतःच्या कृतीची आणि निर्णयाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारा.
सवय २ : शेवटी काय हवे आहे ते डोळ्यासमोर ठेवा :
कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी आपले ध्येय आणि भविष्यातील दिशा स्पष्ट ठेवा
सवय ३ : महत्वाच्या गोष्टींना पहिले प्राधान्य द्या :
कमी महत्वाच्या गोष्टी बाजूला ठेऊन, ज्या गोष्टी खरोखर महत्वाच्या आणि दीर्घकालीन फायद्याच्या आहेत त्या आधी करा
सवय ४ : दोघांचा ही फायदा होईल असा विचार करा :
इतरांना हरवून स्वतः जिंकण्या ऐवजी, सर्वांना फायदा होईल असा परस्पर संबंधांचा दृष्टिकोन ठेवा
सवय ५ : पहिले समजून घ्या, मग समजून सांगा :
इतरांचे म्हणणे आधी पूर्ण आणि एकाग्रतेने ऐकून घ्या, त्या नंतर आपले मत मांडा
सवय ६ : एकत्रितपणे काम करा :
इतरांसोबत मिळून काम करा. दोन किंवा अधिक लोकांच्या एकत्र युक्तीने मुळे समस्येवर उपाय शोधता येतो.
सवय ७ : स्वतःची क्षमता सतत वाढवत रहा :
शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर स्वतःला सतत अपडेट करत रहा.
हे पुस्तकं आपल्याला प्रामुख्याने स्वतःमध्ये बद्दल घडवून आयुष्य कसे यशस्वी आणि समाधानी बनवायचे हे शिकवत. स्टिफन कोवे यांच्या मते, यश हे केवळ बाह्य कौशल्यांवर नाही, तर माणसाच्या आंतरिक चारित्र्यावर अवलंबून असते.
२. द फोर अवर वर्क विक :
लेखक टिम फेरिस यांनी लिहिलेल्या "द फोर अवर वर्क वीक" हे पुस्तकं एक जग प्रसिद्ध पुस्तकं असून हे पुस्तकं नोकरीच्या पारंपारीक संकल्पनेला आव्हान देते आणि कमीत कमी वेळ काम करून जास्तीत जास्त आर्थिक स्वातंत्र्य आणि आयुष्य जगण्याचा आनंद कसा मिळवावा हे शिकवत.
टिम फेरिस यांनी हे पुस्तकं D - E - A - L या चार टप्प्यांच्या फॉरम्युलामध्ये विभागले आहे.
1. D - डेफिनेशन
* अंधाधुंद धाव थांबवा :
वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होऊन आयुष्य जगण्याच्या जुन्या विचारसरणीला नकार द्या
* न्यु रिच बना :
न्यु रिच म्हणजे असे लोक जे आजच स्वतःच्या वेळेवर आणि प्रवासावर नियंत्रण ठेऊन हवे तसे आयुष्य जगत आहे.
* नियम बदला :
जीवनात मोठे बद्दल घडवण्यासाठी पारंपारीक आणि जुने नियम तोडणे आवश्यक आहे.
2. E - इलिमिनेशन
* वेळेच व्यवस्थापन थांबवा :
वेळेचे व्यवस्थापन करण्यापेक्षा कामाचे प्रमाण कमी करण्यावर भर द्या
* 80/20 चा नियम :
तुमचे 80% उत्पन्न हे तुमच्या 20% कामांमधून येते. त्यामुळे इतर 80% निरूपयोगी कामे शोधून ती बंद करा
* माहितीचा उपवास :
सतत बातम्या, ईमेल, आणि सोशल मीडिया पाहणे बंद करा. फक्त गरजेची माहितीच स्वीकारा.
3. A - ऑटोमेशन :
* आउट सोर्सिंग :
तुमची दैनंदिन आणि साधी काम करण्यासाठी व्हर्च्यूअल असिस्टंट नियुक्त करा.
* स्वतःचा व्यवसाय :
अस एखाद उत्पादन किंवा सेवा आधारित व्यवसाय सुरु करा जो तुमच्या शिवाय (ऑटो पायलट वर ) चालु शकेल.
* वेळेची कमाई :
पैशांपेक्षा वेळेची कमाई महत्वाची आहे. व्यवसाय असा असावा जो तुम्हाला दर महा नफा देईल पण तुमचा वेळ खाणार नाही.
4. L - लिबरेशन :
* भौगोलिक स्वातंत्र्य :
कामासाठी एकाच ठिकाणी अडकून राहू नका. तंत्रज्ञानाचा वापर करून जगाच्या पाठीवर कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य मिळवा.
* मिनी रिटायर्डमेंट :
आयुष्याच्या शेवटी निवृत्त होण्या ऐवजी, सध्याच्या आयुष्यातच दर काही महिन्यांनी छोटे छोटे ब्रेक किंवा सुट्ट्या घेऊन जीवन एन्जॉय करा
* भीतीवर मात :
नोकरी सोडण्याची किंवा नवीन काहीतरी करण्याची भीती मनातून काढून टाका.
थोडक्यात सांगायचं तर, हे पुस्तकं तुम्हाला "कामासाठी जगणे" सोडून "जगण्यासाठी काम करणे" आणि स्वतःच्या वेळेचे मालक कसे बनायचे हे शिकवते
3. द वन थिंग :
गॅरी केलर आणि जे पापासॅन लिखीत "द वन थिंग" हे पुस्तकं असामान्य यशाचा सोपा मार्ग सांगणार एक सुंदर वाचनीय पुस्तकं आहे.
हे पुस्तकं आपल्याला शिकवत की, जर तुम्हाला आयुष्यात कमालीचे यश मिळवायच असेल तर तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या शंभर गोष्टी करण्या ऐवजी फक्त एकच सर्वात महत्वाच्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे.
1. एकाग्रतेचा शोध (द फोक्सिंग क्वेश्चन) :
पुस्तकाचा मुळ गाभा एका प्रश्नावर केंद्रित केला आहे, ज्याला लेखकाने 'फोक्सिंग क्वेश्चन' म्हणले आहे.
* "अशी कोणती 'एकच गोष्ट' मी आत्ता करू शकते, जी केल्यामुळे इतर सर्व गोष्टी करणे सोप्या होतील किंवा त्यांची गरजच उरणार नाही?"
हा प्रश्न स्वतःला सतत विचारल्याने तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील सर्वात महत्वाची पायरी ओळखता येते.
2. यशाचा डोमिनो इफेक्ट :
* एक छोटा डोमिनो स्वतः पेक्षा 50% मोठ्या आकाराच्या डोमिनोला पाडू शकतो.
* जर तुम्ही दररोज तुमच्या आयुष्यातील फक्त 'त्या एका' महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित केले, तर हळू हळू खूप मोठे ध्येय सहज साध्य होते.
3. यशाबद्दलचे 6 खोटे गैरसमज :
लेखकाने आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या 6 मुख्य गैरसमजांचा उल्लेख केला आहे.
1. सर्व गोष्टी सारख्याच महत्वाच्या असतात :
हे खोटं आहे 80/20 च्या नियमानुसार फक्त 20% कामे 80% निकाल देतात.
2. मल्टीटास्किंग :
एकाच वेळी अनेक कामे केल्याने कामाचा दर्जा घसरतो आणि वेळ वाया जातो.
3. शिस्तबद्ध आयुष्य :
तुम्हाला प्रत्येक गोष्टीत शिस्त आणणायची गरज नाही, तर फक्त एक चांगली सवय अंगीकारण्यासाठी 66 दिवस शिस्त पाळणे पुरेसे आहे.
4. इच्छाशक्ती नेहमी सोबत असते:
इच्छाशक्ती ही मोबाईल च्या बॅटरीसारखी असते. ती दिवसाच्या सुरवातीला जास्त असते आणि नंतर कमी होते. त्यामुळे महत्वाची कामे सकाळी करा.
5. संतुलित आयुष्य :
खूप यश मिळवण्यासाठी काही काळ एकाच गोष्टीवर खूप लक्ष केंद्रित करावे लागते, त्यामुळे पूर्ण संतुलन राखणे आवश्यक आहे.
6. मोठा विचार करणे हा गुन्हा आहे :
मोठा विचार करा आणि मोठे ध्येय ठेवा अपयशची भीती बाळगू नका.
4. उत्पादकता वाढवण्याचा मार्ग :
1. टाइम ब्लॉकिंग :
दिवसातील सर्वात महत्वाच्या 'एका' कामासाठी दिवसाच्या सुरवातीचे 4 तास राखून ठेवा. या काळात फोन, सोशल मीडिया, आणि इतर सर्व डिस्ट्रॅक्शन्स पूर्णपणे बंद ठेवा.
2. नाही म्हणायला शिका :
जेव्हा तुम्ही तुमच्या 'एका' महत्वाच्या गोष्टीला हो म्हणता. तेव्हा तुम्हाला इतर निरूपयोगी गोष्टींना नाही म्हणता आल पाहिजे.
थोडक्यात सांगायचं तर, एकाच वेळी शंभर गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा एकच महत्वाची गोष्ट निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा हीच गोष्ट हे पुस्तकं शिकवत.
ही पुस्तकं तुम्ही का वाचावीत?:
जीवनात प्रत्येकालाच यश हव असत. आणि काही वेळा एखाद्याला ते यश मिळत पण काही वेळा व्यक्ती फक्त यशाच्या मागे नुसतीच धावत असते. कारण यश मिळवण हे सोप नसतं पण अवघड ही नसतं.
1. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. 2. द फोर अवर वर्क वीक. आणि 3. द वन थिंग ही 3 पुस्तकं आपल्याला शिकवतात आपल्या सवयी ओळखून त्यावर काम करून योग्य पद्धतीने ध्येय निश्चिती करून आपली स्वप्न कशी पूर्ण करायची.
आणि म्हणूनच ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत त्यांनी ही पुस्तकं नक्कीच एकदा तरी वाचलीच पाहिजेत.
निष्कर्ष :
चांगलं पुस्तक फक्त वाचायचं नसतं, तर त्यातून मिळालेली शिकवण आपल्या आयुष्यात उतरवायची असते.
‘अति परिणामकारक लोकांच्या 7 सवयी’ आपल्याला स्वतःमध्ये योग्य सवयी निर्माण करून प्रभावीपणे जगायला शिकवतं. ‘द फोर अवर वर्क वीक’ आपल्याला आपल्या वेळेची आणि आयुष्याची किंमत समजावून देतं, तर ‘द वन थिंग’ आपलं लक्ष विखुरू न देता सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर केंद्रित राहायला शिकवतं.
ही तीनही पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीने एकच महत्त्वाचा संदेश देतात — आपलं आयुष्य बदलण्यासाठी आधी आपली विचार करण्याची आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागते.
म्हणून जर तुम्हालाही तुमच्या सवयी सुधारायच्या असतील, तुमची उत्पादकता वाढवायची असेल, ध्येय स्पष्ट करायचं असेल आणि तुमची स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य दिशेने पावलं उचलायची असतील, तर ही तीनही पुस्तकं तुमच्या ‘Must Read’ यादीत नक्कीच असायला हवीत.
कारण शेवटी, यश एका दिवसात मिळत नाही… पण योग्य सवय, योग्य दिशा आणि योग्य कृती दररोज केली, तर एक दिवस ते यश नक्कीच आपल्या मिळत.
0 Comments