Advertisement

Responsive Advertisement

हरवलेली नाती (भाग - पाच)


हरवलेली नाती - (भाग - पाच)

मागील भागात...

"काळजी करू नकोस रे तुला इथे खुप मोकळ वातावरण अनुभवायला मिळेल बघ खुप शिकायला मिळेल कस असत न जीथे मोकळ वातावरण असत न तिथेच माणूस ग्रो करू शकतो तुला ही कळेल जेव." संकेत म्हणाला 

आणि सगळे जेवण करू लागले.

*********

आता पुढे..

काही वेळा नंतर...

"बर आजचा चहा पाजण्याचा कुणाचा टर्न आहे." हात धूत संकेत ने विचारलं 

"एक काम करूयात न प्रणव चा आज पहिला दिवस आहे ऑफिस चा तर प्रणव चहा पाजेल आज काय रे चालेल न तुला." रुद्र ने विचारलं 

प्रणव थोडा गांगरला.

"अरे काय तु कसा काम करणार आहेस इथे मजा घेतोय तो तुझी काळजी करू नकोस होईल ह्याची पण हळू हळू सवय बर मी देतो आज सगळ्यांना चहा." संकेत उठत म्हणाला

आणि सगळे हसू लागले..

"छोटू सात चहा आण लवकर.. आणि बिल माझ्या खात्यात लिहायला सांग." संकेत नी उठून ऑर्डर दिली 

"प्रणव एवढा विचार करायचा नसतो रे आणि हे बघ ह्या जगात राहायचं असेल न तर आधी शांत राहणं सोडून दे मी देखील नवीन नवीन असाच होतो ह्या लोकांनी बिघडवलं मला आणि अश्या बिघडण्यात काहीच चूक नाही हा एकदम बिनधास्त राहायचं बघ छान चेष्टा मस्करी करायची हसतमुख राहायचं हे काय बुजरे पणा." रुद्र ने समजावलं 

तोच छोटू चहा घेऊन आला.

"बर सोडा विषय आता आधी चहा चा आनंद घ्या मग बाकीच बर अजून काही आणू का." सगळ्यांना चहा देत छोटू ने विचारलं 

"बर हा छोटु बर का आपले सेक्युरिटी दादा आहेत न त्यांचा मुलगा. आणि छोटु हे नवीन साहेब ह प्रणव सबनीस." संकेत ने ओळख करून दिली 

"अरे वाह तु भैरू चा मुलगा का बर तुझी बहीण कशी आहे सकाळी भैरू सांगत होता आजारी आहे म्हणून." आपुलकीने प्रणव ने विचारलं 

"त्रास तर होतोय साहेब तीला बघु डॉक्टर काय म्हणतात ते तुम्हाला अजून काही आणू का." छोटु ने विचारलं 

"नको एवढच ओके आहे काळजी घे बहिणीची." प्रणव आपुलकीने म्हणाला 

छोटु ने स्मित हास्य केल आणि निघून गेला आणि इकडे सगळे चहा चा आनंद घेऊ लागले.

अर्ध्या तासा नंतर...

"चलो फ्रेंड्स बॅक टु वर्क खुप काम पेंडिंग आहेत." जागेवरून उठत रुद्र म्हणाला.

तोच सगळे आपापल्या जागेवरून उठले आणि ऑफिसकडे रवाना झाले.

सुयोग मल्टी सर्व्हिसेस...

"चला डाटा एंट्री च काम तर झालय आता आधी प्रोजेक्ट ची माहिती बघतो मग पुढच काम." प्रणव खुर्ची वर बसत मनाशीच पुटपुटला 

आणि लगेच कामाला लागला...

काही तासा नंतर...

वेळ संध्याकाळी 5:30 ची....

"चला आजचा पहिला दिवस तर छान च गेला कधी एकदा आईला सगळं सांगतो अस झालय मला खुप मेहनत घेतली आहे माझ्यासाठी दोघांनी वाटणार च कस मी पहिलं पाऊल टाकलय हे जाणून घ्यावस असच करतो यस. शेवटी पहिली 
नोकरी पहिला दिवस हा पहिल्या पगारा सारखा असतो कारण इथूनच तर खऱ्या आयुष्याची सुरवात होत असते मी खरच खुप भाग्यवान आहे जे मला असे आई बाबा मिळाले आहेत." आवरता आवरता प्रणव मनाशीच बोलला 

आणि लगेच डेस्क आवरून घरी निघण्याची तयारी करू लागला तोच. एका गोड आवाजाने त्याच लक्ष वेधलं.

"तु प्रणव आहेस न आपण कंप्युटर च्या क्लास मध्ये पहिल्यांदा भेटलो होतो आठवलं." उत्साहाने प्रिया म्हणाली 

"तु प्रिया? अरे बापरे किती वर्षानी होतीस कुठे इतके वर्ष आणि इथे कशी?" आनंदाने प्रणवने विचारलं 

"अरे हे माझ्या बाबांचं च ऑफिस आहे पण तु कसा इथे." प्रिया ने विचारलं 

"माझा आज पहिला दिवस होता ऑफिस चा संकेत ची टिम बस आजचा दिवस झाला आता घरी मी आजच जॉईन केलय न ऑफिस." प्रणव म्हणाला 

"अरे वाह, अगदी योग्य ठिकाणी आला आहेस तु आता पार्टी तर झालीच पाहिजे आणि मी काहीच ऐकणार नाही ह मी जस्ट बाबाला भेटून येते मग निघु." उत्साहाने प्रिया म्हणाली.

आणि प्रणव काही बोलायच्या आत निघून गेली.

क्रमशः...

तर प्रणव च्या आयुष्यात त्याच्या प्रेमाची एंट्री झाली आहे एका उत्साही चंचल मुलीची एंट्री झाली आहे आता ही लव स्टोरी प्रणव ला कुठे नेईल.
प्रणव आणि प्रिया च हे नात दोघांना कुठे नेईल?
ही लव स्टोरी कशी पूर्ण होईल?
आणि महत्वाच प्रणव ची ऑफिस ची लाईफ कशी असेल?
बघुत पुढील भागात.

Post a Comment

0 Comments