Sunday, 8 February 2026

हरवलेली नाती (भाग - १)

आज काल प्रत्येकजण आपल्या स्वप्नामागे इच्छांमागे धावत चालला आहे प्रत्येकाला काही तरी मिळवण्याचा ध्यास लागला आहे हे खर तर योग्य ही आहे पण काही तरी मिळवण्याच्या नादात आपण आपल्या नात्यांना मागे टाकलेलं चालणार नाही.
पण काही लोक असच करतात आपलं स्वप्न पुर्ण करण्यात इतके व्यग्र होऊन जातात की आपण काही तरी मागे सोडलय याचाच त्यांना विसर पडतो.
असच काहीस झालं प्रणव च्या बाबतीत प्रणव ने आपल्या जीवनात बराच पैसा प्रेम फेम मिळवलं पण एक गोष्ट आपल्या आयुष्यात खुप महत्वाची असते ती म्हणजे आपली नाती हेच तो विसरला.
प्रणव ने आपलं करिअर तर मेहनत घेऊन उच्च शिखरावर नेलं विदेशात एक भागीदारीत मल्टी नॅशनल कंपनी सुरु केली त्या कंपनीला ही उच्च शिखरावर नेलं पण त्याच्या याच शिक्षणासाठी त्याच्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचल अश्या आपल्या आई वडिलांनाच तो विसरला
त्याने आपलं स्थान तर उंचावलं पण एकट्यानेच आज तो सक्सेस च्या अश्या उच्च स्थानावर आहे जीथे आजपर्यंत कुणीच पोहोचल नसेल कसा होता त्याचा प्रवास काय आहे त्याची कहाणी बघुत या कथेत.

हरवलेली नाती - भाग १

गोकुळ निवास...
वेळ सकाळी 8 वाजताची...
प्रणव ची रूम...

"अँड अवॉर्ड गोज टु प्रणव प्रशांत सबनीस."

नाव घेताच प्रणव स्टेजवर पोहोचला आणि त्याने अवॉर्ड घ्यायला हात पुढे केला.

"प्रणव.. उठ बेटा सकाळ झाली किती झोपणार आहेस आज ऑफिसचा पहिला दिवस आहे न पहिल्याच दिवशी जर उशिरा पोहोचलास तर कस चालेल उठ लवकर." दुर्गा ताई रूम आवरता आवरता म्हणाल्या 

आणि लगेच रूम आवरू लागल्या.

काही क्षणा नंतर...

आवाज ऐकताच प्रणव उठला आणि आपले डोळे चोळू लागला तोच त्याला स्वप्न आठवलं आणि त्या स्वप्नात तो हरवून गेला.

साधारण 5 मिनीटांनी...

"ओह नो.. आठ वाजले आई हेच जरा अजुन लवकर उठवायच न ग ऑफिस सुरु व्हायची वेळ 9 वाजताची आहे आता उशीर होणार बघ मला शीट.." चादर काढत बेडवरून उठत प्रणव म्हणाला 

आणि लगेच आपलं आवरायला गेला.

पंधरा मिनीटां नंतर...

प्रणव फॉर्मल लुक मध्ये खुपच डॅशिंग दिसत होता. 5 : 7 हाईट रंग गोरा ब्ल्यू कलरचा फॉर्मल टी शर्ट घातलेला तसेच खांद्यावर लॅपटॉप ची बॅग घेतलेली त्याच्या या लूक मुळे तोच कंपनी चा मालक आहे असच कुणाला ही वाटेल असा तो दिसत होता तो आपल्या टी शर्ट च्या भाया फोल्ड करत खाली आला.

"आई उशीर होतोय ग चल लवकर मला नाश्त्याला दे लवकर अजुन उशीर नको व्हायला." खुर्ची वर बसत प्रणव ने आवाज दिला 

तोच दुर्गा ताई डिश घेऊन आल्या.

"घे बाळ आज उठायला खुपच उशीर झाला काही काम करत होतास का?" डिश समोर ठेवत दुर्गा ताईंनी विचारलं

"हो अग आज पहिला दिवस आहे न ऑफिस चा तयारी करत होतो." नाश्त्याची डिश जवळ ओढत प्रणव ने उत्तर दिल 

आणि लगेच नाश्ता करू लागला.

काही वेळा नंतर...

"चल तुम्ही दोघ ही नाश्ता करून घ्या मी आता पळतो." हात धूत प्रणव म्हणाला 

आणि लगेच नाश्ता करून ऑफिस ला निघून गेला.

क्रमशः...

तर ही एक अश्या मुलाची कथा आहे जो आपल्या सक्सेस च्या नादात सगळच हरवून बसला.
काय प्रणव चा ऑफिस चा पहिला दिवस आहे मग आता पुढे काय होणार.
प्रणव च्या यशाचा हा प्रवास त्याला कुठे नेणार आहे?
त्याच सतत जिंकण त्याला आपल्याच कुटुंबा पासून दुर नेईल का?
कसा असेल त्याचा हा प्रवास?
बघुत पुढील भागात 

No comments:

Post a Comment

माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामाज

माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामाज  प्रस्तावना : आपण दिवसभर आपल्या कामा मध्ये बिझी असतो. त्या कामातून संध्याकाळच्या वेळी आपल्याला थो...