Saturday, 28 February 2026

हरवलेली नाती (भाग - 2)

हरवलेली नाती (भाग - 2)

आणि लगेच नाश्ता करू लागला.

काही वेळा नंतर...

"चल तुम्ही दोघ ही नाश्ता करून घ्या मी आता पळतो." हात धूत प्रणव म्हणाला 

आणि लगेच नाश्ता करून ऑफिस ला निघून गेला.

काही वेळा नंतर...

सुयोग मल्टी सर्व्हिसेस...

वेळ 11 वाजताची...

आज सकाळ पासूनच ट्रॅफिक जाम होत त्यामुळे सुयोग मल्टी सर्व्हिसेस कंपनी देखील उघडली नव्हती एव्हाना ऑफिसच्या मेन गेट वरचा सेक्युरिटी गार्ड देखील झोपेतच होता तोच प्रणव आपल्या बाईक वरून ऑफिसला पोहोचला.

"सेक्युरिटी..." हॉर्न देत प्रणव ने आवाज दिला 

तोच सेक्युरिटी गार्ड खडबडून जागा झाला आणि आपल्या डोक्यावरची टोपी नीट करत जागेवरच उभा राहिला आणि सलाम करत त्याने गेट उघडलं.

"हे काय ऑफिस तर नऊ लाच उघडत न मग अकरा वाजले तरी अजुन बंदच आहे आज सुट्टी आहे का." बंद असलेल्या ऑफिस कडे बघत प्रणवने विचारलं 

"नाई साहेब आज ते काय कसला तरी कार्यक्रम आहे न त्यामुळे ट्रॅफिक वाढली आहे म्हणून आज उशीर होईल असा सरांचा फोन आला होता." सेक्युरिटी गार्ड ने सांगितलं 

"ठिक आहे मग आता चावी कुणाकडे आहे ऑफिसची मी आत तरी बसतो." प्रणव म्हणाला 

"साहेब चावी मॅनेजर सरांकडे असते त्यांना ही अजुन वेळ होणार आहे तोपर्यंत तुम्ही इथे बसा की मी चहा कॉफी काही मागवू का तुम्हाला." सेक्युरिटी गार्ड ने विचारलं 

"ठिक आहे मग आता मागव चहा दुसरा पर्यायच नाहीये." प्रणव म्हणाला 

लगेच गार्ड चहा आणायला गेला.

काही वेळा नंतर...

"हे घ्या साहेब इथे जवळच एक टपरी आहे तिथला चहा खुपच चांगला असतो झोपच उडून जाते घेऊन बघा." हातात कप देत सेक्युरिटी गार्ड म्हणाला 

"थँक्स गरज होतीच याची मला." कप घेत प्रणव म्हणाला

आणि दोघ मिळून चहा घेऊ लागले.

"तु इथे किती वर्षां पासून आहेस?" प्रणव ने विचारलं 

"मला दोन वर्ष झाले साहेब इथ लागून." सेक्युरिटी गार्ड ने सांगितलं 

"अरे वाह छान आहे तुला माहित नाही का मग ड्युटीवर झोपायचं नसतं झोपायला लागलास तर काम कस करशील." प्रणव म्हणाला 

"माफ करा साहेब मी खर तर झोपत नाही पण सध्या दोन ठिकाणी काम करतोय मी गरिबी हाय साहेब त्यातून माझी धाकटी मुलगी आजारी हाय त्यामुळे पैसे बी जास्त लागतात म्हणून करावं लागत काम डोळ्याला डोळा लागत नाही बघा म्हणून आज सकाळीच थोडीशी झोप लागली बघा पण इथून पुढे अस होणार नाही." माफी मागत सेक्युरिटी गार्ड म्हणाला 

"अरे हरकत नाही होत असत अस कधी कधी तुला कळल न बस बाकी चहा खरच खुप चांगला होता हं फ्रेश वाटलं एकदम मी तुला कधी कधी आणायला सांगितलं तर आणत जाशील न?" प्रणव ने विचारलं 

"म्हणजे काय सर तुम्ही मला कधी ही सांगा मी घेऊन येत जाईन." सेक्युरिटी गार्ड म्हणाला 

"बर तुझ नाव काय आहे?" प्रणव ने विचारलं 

"भैरू साहेब मला सगळे भैरू च म्हणतात " भैरू ने सांगितलं 

"अरे वाह छान नाव आहे भैरू तुझ मग आज पासून मी ही तुला भैरूच म्हणेन चालेल न." प्रणव ने विचारलं 

"हो.. हो साहेब नक्कीच चालेल." भैरू म्हणाला 

"बर ऐक तुझी मुलगी आजारी आहे न हे थोडे पैसे ठेव जवळ उपयोगी पडतील हं काही लागलं तर सांग." प्रणव म्हणाला 

"अहो हे काय साहेब याची काय गरज आहे." भैरू म्हणाला 

"अरे ठेव जवळ अडी अडचणीत कामी येतात काळजी करू नकोस हं." पैसे हातात ठेवत प्रणव म्हणाला.

तोच ऑफिस मधले बाकीचे कर्मचारी देखील आले आणि मॅनेजर ने ऑफिस उघडल तस सगळे ऑफिस मध्ये शिरले.

क्रमशः...

चला प्रणव चा आपलं शिखर गाठण्याचा प्रवास सुरु झाला.
कसा असेल त्याचा हा प्रवास 
हा प्रवास त्याला यश देखवेल की अपयश 
आणि आई बाबांचं काय होईल 
बघुत पुढील भागात 

No comments:

Post a Comment

माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामाज

माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामाज  प्रस्तावना : आपण दिवसभर आपल्या कामा मध्ये बिझी असतो. त्या कामातून संध्याकाळच्या वेळी आपल्याला थो...