Monday, 23 February 2026

परतफेड (फ्लॅश फिक्शन )

परतफेड 

तो रोज त्या पार्किंग जवळ आपल्या गाडीवर इलेक्ट्रिक चहाचे भांडे आणि काही कप घेऊन बसत असे त्या दिवशी सुद्धा तो सकाळी येऊन बसला होता आणि येणाऱ्या लोकांची वाट बघत होता पण आज मात्र त्या पाच जणी तीथे आल्या नाहीत तो बराच वेळ त्यांची वाट बघत तिथेच एका कोपऱ्यात बसला होता तो. म्हणजे 
शंभु शंभूची गाडी तीथे खुपच परिचित होती तसा त्याचा चहा करण्याचा हात खंडा ही होता एकदा जर कुणी त्याच्या गाडीवरचा चहा घेतला तर तो कायमचा त्याचा गिर्हाईक होत असे अशीच त्या पाच जणी देखील होत्या पण शंभु इतकी त्यांची वाट का बघत होता 
काही क्षणा नंतर...
त्या पाच जणी तीथे पोहोचल्याच शंभु ला जरा धिर आला त्याने लगेच खुरच्या साफ करून त्यांना बसायला जागा दिली आणि पाच ही जणांना चहा ही दिला 
काही वेळा नंतर...
आपल्या पाकिटातून त्याने 2000 रुपये काढले आणि म्हणाला.
"ताई हे तुमचे 2000 रुपये. त्यादिवशी तुम्ही मला मदत केलीत म्हणून आज मी ही चहाची छोटीशी टपरी काढु शकलो तुमचे खुप खुप आभार." 
लगेच पाच जणींपैकी एकीने ते पैसे आपल्या जवळ ठेवले आणि म्हणाली.
"खुप खुप आभार खुप मेहनत कर आणि आपलं नाव कमव."
एवढं बोलून सगळ्या जणी तिथून निघून गेल्या

No comments:

Post a Comment

माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामाज

माझे आवडते टॉप 6 शॉर्ट ड्रामाज  प्रस्तावना : आपण दिवसभर आपल्या कामा मध्ये बिझी असतो. त्या कामातून संध्याकाळच्या वेळी आपल्याला थो...