हरवलेली नाती 3
सुयोग मल्टी सर्व्हिसेस...
वेळ सकाळी 11 वाजताची...
ऑफिस मधील सगळे कर्मचारी ऑफिस मध्ये पोहोचले तोच मॅनेजर विनीत नी ऑफिस उघडल आणि सगळे ऑफिस मध्ये शिरले तस प्रणव ही ऑफिसात शिरला
तो आपल्या स्वप्नाला आपल्या ऑफिसला न्याहाळत ऑफिसमध्ये प्रवेश करत होता त्याच्या मनात अनेक विचारांनी गर्दी केली होती आपलं स्वप्न पूर्ण होईल का?, इथलं वातावरण कस असेल, आपण इंटरव्हयू तर क्रॅक केला आहे पण हे काम आपल्याला जमेल का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळत होते आणि तो प्रत्येक गोष्ट एका वेगळ्याच आशेने न्याहाळत होता तोच मॅनेजर विनीत त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि तो भानावर आला.
"वेलकम प्रणव तुझ सुयोग मल्टी सर्व्हिसेस मध्ये स्वागत आहे आम्ही नव्याने आलेल्या प्रत्येक एम्प्लॉईज च असच स्वागत करतो तु या कपंनीत नवीन आहे आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे अजिबात काळजी करायची नाही मन लावून काम कर अस समज ही तुझी दुसरी फॅमिली आहे काहीही वाटलं तर लगेच विचारायचं तुला एक सांगतो या ऑफिसमध्ये कामाच्या आधी माणसाचा विचार केला जातो इथला प्रत्येक सहकारी तुला रोज नवीन काही तरी शिकवेल काय तेव्हा छान आनंदाने काम कर आणि अगदी मनमोकळ रहा तुझ या ऑफिस मध्ये स्वागत आहे चल तुला सगळ्या सहकार्यांची ओळख करून देतो आणि तुझा डेस्क ही दाखवतो." फुलांचा बुके देत विनीत म्हणाला
"तुम्ही तर माझ्या मनात चाललेल्या सगळ्या प्रश्नांची एका दमात उत्तर दिलीत तुमचे मनापासून आभार खर तर इतक मोठ ऑफिस बघून मी थोडा भांबावलोच होतो पण तुमच बोलण ऐकून आता जरा हायस वाटत आहे मला थँक्यु सो मच सर." बुके घेत प्रणव ने आभार मानले
"अरे वेड्या थँक्यु कसल त्यात मला तुझ्या परिस्थिती ची जाणीव आहे तुझ्या या परिस्थितीतुन आम्ही सुद्धा गेलो आहोत आता फक्त एकच करायचं छान पैकी तुझ्या आयुष्याचा हा काळ आनंदाने अनुभवायचा हीच वेळ आहे करून दाखवायची आता सगळं विसरायचं आणि जोमाने कामाला लागायचं काय? चल तुला सगळ्यांची ओळख करून देतो." प्रणव च्या खांद्यावर हात ठेवत विनीत म्हणाला
गप्पा मारत मारत दोघ ऑफिसच्या कॉरीडोर जवळ पोहोचले.
"हं तर इकडे लक्ष द्या सर्वांनी आज आपल्या समूहात एक आणखी एक सदस्य ऍड झाला आहे आणि आज त्याचा या ऑफिस मध्ये पहिला दिवस आहे तेव्हा आता याला आपल्या समूहात सामायिक करून घ्यायची जबाबदारी आता आपली. तर प्रणव आधी मी तुला या ऑफिस बद्दल थोडक्यात सांगतो. आपलं ऑफिस म्हणजे सुयोग मल्टी सर्व्हिसेस ही एक आय टी कपंनी आहे जीची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली आणि खूपच कमी वेळात या कंपनीने आय टी क्षेत्रात एक उंची गाठली आहे सुयोग मल्टी सर्व्हिसेस ही कपंनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आयटी कन्सलटन्सी च काम करते ग्राहकांनी आपल्या व्यवसायाशी निगडीत कुठले सॉफ्टवेअर वापरावेत नेमक डिजिटल राहून आपला व्यवसाय कसा पुढे न्यावा याचा सल्ला ही कपंनी देते आणि त्याचा ग्राहकांना फायदा ही होतो तसेच आपली कपंनी सॉफ्टवेअर डेवलपमेंट च की काम गेल्या अनेक वर्षांपासून पहात आहे चल आता तुला आपल्या कपंनीच्या डिपार्टमेंट ची ओळख आणि एम्प्लॉईज ची ओळख करून देतो. तर हे शशिकांत शास्त्री हे अकाउंट डिपार्टमेंट बघतात आपल्या कपंनी चा पूर्ण जमा खर्च यांच्या कडेच असतो हे आहेत दिगंबर जोशी हे आपलं एच आर डिपार्टमेंट बघतात हा शंभु आपल्या ऑफिस च कँटीन हा बघतो तु जो मगाशी चहा घेतलास न तो यानेच बनवला होता पुढे गेल तर त्याची स्वतःची एक टपरी आहे जिथून सेक्युरिटी भैरू ने चहा आणला होता तर ही आहे ग्रीष्मा रिसेप्शनीष्ट आहे हे आहेत संकेत, रुद्र, कविता, चारू, मंगेश हे सगळे आपल्या कडचे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत आणि हा सुदीप हा बॅक ऑफिस च काम बघतो तु आता संकेत च्या ग्रुप बरोबर राहणार आहेस तर ही आहे आपली छोटीशी फॅमिली आता छान काम कर हं काही लागलं तर मी आहेच काय आणि संकेत तु आता याला याच काम समजावून सांग नवीन आहे शिकता शिकता येईल सगळं ओके." विनीत ओळख करून देत म्हणाला
"हो सर मी सांगतो याला याच काम तुम्ही काळजी करू नका." लगेच संकेत म्हणाला
आणि तोच सगळे गप्पांमध्ये रंगून गेले.
क्रमशः...
काय? प्रणव च ऑफिस मध्ये स्वागत झालं आता पुढे काय होणार.
प्रणवचा हा प्रवास त्याला कुठे नेईल?
तो आपली स्वप्न पुर्ण करू शकेल का?
की या प्रवासात त्याला कुणाची तरी साथ लाभेल?
बघू पुढील भागात
No comments:
Post a Comment